तुम्ही पाहिला आहे का ‘माधवी भिडे’चा हा हटके अंदाज!


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यानाच आवडते. त्याचबरोबर या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. सध्या सोशल मीडियावर या मालिकेत सेक्रेटरी आत्माराम भिडे गुरुजींच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी चर्चेत आहे. यामागे तिने नुकताच केलेला फोटोशूट हे कारण आहे. माधवी भिडेची सोज्वळ भूमिका अकरा वर्षे साकारलेल्या सोनालिकाचा हा ‘व्हॅम्पिश लूक’ पाहून तुम्हीही देखील हैराण व्हाल.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनालिकाने काही फोटो पोस्ट केले आहेत. मी गेल्या अकरा वर्षांपासून माधवीची भूमिका साकारत आहे आणि आता थोडेसे आव्हानात्मक काही करायची इच्छा आहे. नेहमीच हटक्या आणि वेगळ्या भूमिकांची भूक कलाकारांना असते आणि ती असलीही पाहिजे, असे तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सोनालिकाने दिलेल्या कॅप्शनवरून ती लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे वाटते. तिचे हे वेगळे रुप सध्या तरी चाहत्यांना आवडले असून त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.

Leave a Comment