चांद्रयान-2 चंद्रावर 7 सप्टेंबरला उतरणार


बंगळुरू – लवकरच पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत भारताचे बहुचर्चित चांद्रयान- २ पोहोचणार आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबरला चांद्रयान उतरणार असल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष शिवन यांनी दिली.

चांद्रयान-2 14 तारखेला पहाटे 3.30 मिनिटांनी पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्राच्या कक्षेकडे मार्गक्रमण करेल. याला ट्रान्स-चंद्र इंजेक्शन शास्त्रीय भाषेत असे म्हटले जाते. चांद्रयान 20 ऑगस्टला चंद्राजवळ पोहोचेल, तेथून चंद्र कक्षेत अंतर्भुत होण्याची प्रक्रिया सुरू होईल. 20 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या कक्षेत भ्रमण करेल, त्याकाळात चंद्राभोवतीच्या वातावरणाचा आणि इतर घटकांचा अभ्यास करता येईल. शेवटी 7 सप्टेंबरला चांद्रयान चंद्रावर उतरेल, असे अध्यक्ष शिवन यांनी सांगितले.