व्हायरल झालेले हे फोटो आहेत फेक


सोशल मीडियावर अनेक खोटे फोटो चुकीची माहिती देत व्हायरल केले जात असतात. फोटोबद्दल चुकीची माहिती सांगत लोकांची दिशाभूल केली जाते. आज आम्ही अशाच इंटरनेटवर सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या फोटोचे सत्य सांगणार आहोत.

दावा – एक सीरियाचा मुलगा आपल्या आई-वडिलांच्या थडग्याजवळ बसला आहे.

सत्य –  हा मुलगा फोटोग्राफरचा भाचा आहे आणि तो सीरियाचा नाही. थडग्याप्रमाणे दिसणारा तो आकार केवळ दगड आहेत.

दावा – Metro Goldwyn Mayer नावाच्या कंपनीने आपल्या लोगोसाठी सिंहाला बांधले आहे.

सत्य – आजारी असलेल्या या सिंहाचे इस्रायलच्या पाळणाघरात सिटीस्कँन सुरू आहे.

दावा – रेहाना नावाच्या या मुलीला एंजेल ऑफ कोबेन म्हटले जात आहे. काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की, या मुलीने 100 आयएस मुलांना मारले आहे.

सत्य – या मुलीने कधीही 100 आयएस मुलांना मारलेले नाही. तसेच हा फोटो व्हायरल झाला तेव्हा ही मुलगी लॉची विद्यार्थींनी होती व ती स्वेच्छेने होम गार्ड युनिटमध्ये सहभागी झाली होती.

दावा – निळे टरबूज. हे टरबूज जापानच्या काही भागात मिळते व याची किंमत 16,000 येन म्हणजेच 200 डॉलर आहे.

सत्य – हे एक सर्वसाधारण टरबूज असून, ज्याचा रंग डिजीटलद्वारे बदलण्यात आला आहे. या फोटो बरोबर सांगण्यात आलेले दावे खोटे आहेत.

दावा – मिस्त्रच्या स्फिंक्समध्ये बर्फ पडला. उत्तर अफ्रिकेत 112 वर्षात पहिल्यांदाच बर्फ पडल्याचा दावा करण्यात आला आहे.

सत्य – हा जापानच्या टोबू वर्ल्ड स्कायर थिम पार्कचा फोटो आहे. जेथे मिस्त्रच्या स्फिंक्सची प्रतीकृती बनवण्यात आली आहे.

दावा – अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरला 9/11 ला विमान धडकण्याआधी ब्लिडिंगवर उभा असलेला पर्यटक.

सत्य –  हा फोटो 28 नोव्हेंबर 1997 ला पीटर गुजली नावाच्या व्यक्तीने काढला आहे. हा फोटो एडिटकरून सोशल मीडियावर पसरवला जात आहे.

Leave a Comment