शाओमी आणणार १०० एमपी कॅमेरावाला स्मार्टफोन


चीनी कंपनी शाओमी लवकरच १०० एमपी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. कंपनीने ट्विटरवर ही माहिती दिली असून शाओमी भारत शाखेचे प्रमुख मनुकुमार जैन यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. ट्विटरवर या स्मार्टफोनची माहिती देणारा टीझर आणि इमेज दिली गेली आहे.

जैन यांच्या म्हणण्यानुसार शाओमी या वर्षअखेर ६४ एमपीचा कॅमेरा असलेला रेडमी नोट ८ सादर करणार आहे आणि त्यानंतर १०० एमपी कॅमेरावाला फोन आणणार आहे. त्याचे काम सुरु आहे. हा फोन मी मिक्स ४ चे अपग्रेड व्हर्जन असू शकेल. रिपोर्ट नुसार भारतीय बाजारात हा नवा फोन लगोलग सादर केला जाईल.

२०१९ मध्ये शाओमीने स्मार्टफोन कॅमेरा क्वालिटी अधिक चांगली करण्यावर लक्ष केंद्रित केले असून सर्वप्रथम रेडमी नोट ७ प्रो हा ४८ एमपी कॅमेरावाला फोन, त्यानंतर याच सेन्सरसह रेडमी के २० प्रो सादर केले असून आता कंपनी ६४ एमपी कॅमेरावाला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Leave a Comment