आयुष्मान खुरानाबद्दल काही खास


यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विकी कौशलसह विभागून मिळविलेला गुणी अभिनेता आयुष्मान खुराना विषयी चित्रपट रसिकांना अजून खूप माहिती नाही. प्रत्यक्ष आयुष्यात आयुष्मान खरोखर कसा आहे हे त्यासाठी जाणून घ्यावे लागेल.

आयुष्मानने २०१२ मध्ये विकी डोनर चित्रपटातून बॉलीवूड डेब्यू केला हे बहुतेक जाणतात. पण खऱ्या आयुष्यात सुद्धा आयुष्मान स्पर्म डोनर होता हे अनेकांना माहिती नसेल. एका मुलाखतीत त्याने स्वतः ही माहिती दिली होती. मुलाखतीत त्याने तो आणि त्याचे मित्र दिल्ली मुंबई रेल्वेत डब्याडब्यात जाऊन गाणी म्हणत आणि त्याबदली लोक त्यांना पैसे देत असेही सांगितले होते. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तो प्रथम रेडियो जॉकी होता आणि तेथे तो यशस्वी झाल्यावर व्हिडीओ जॉकी बनला. तो अतिशय पॉप्यूलर व्हिडीओ जॉकी होता.

आयुष्मान अभ्यासातही हुशार होता. त्याने चंडीगड पंजाब विद्यापीठातून मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम क्रमांकाने पदवी मिळविली आहे. तो त्यावेळी गात असे. आणि त्याचा उपयोग त्याने मित्रांसह रेल्वेत गाणी म्हणण्यासाठी केला आहे. त्याचा रोल मॉडेल आहे शाहरुख. एक विशेष योगायोग म्हणजे आयुष्मानने मुंबईत शाहरुखच्या ओम शांती ओमचे पोस्टर पहिले आणि एक दिवस आपलेही पोस्टर येथे झळकले पाहिजे अशी मनीषा धरली आणि खरोखरच त्याचे पोस्टर याच जागेवर झळकले. त्याचे वडील ज्योतिषी होते. आयुष्मानला स्ट्रीटफूड प्रचंड आवडते. त्याला थियेटरची आवड असून कॉलेज मध्ये त्याने थियेटर ग्रुप स्थापन केला होता.