या कंपनीच्या चिप्सची किंमत वाचून तुम्ही व्हाल हैराण


जास्तीत जास्त 20 ते 30 रुपयांना बटाट्याच्या वेफर्सचे पॅकेट मिळते, हे तर आपण सर्वचजण जाणतो आणि आपल्यापैकी अनेकजण बटाट्याच्या वेफर्सचे शौकिन आहेत. प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स मिळतात. पण आम्ही आज तुम्हाला जगातील सर्वात महाग बटाट्यांच्या वेफर्सबाबत सांगणार जे खाताना आपण दहावेळा नक्कीच विचार करु…

जगातील सर्वात महागडे बटाट्याचे वेफर्स स्वीडनची सेंट एरिक्स ब्रुवरी ही कंपनी बनवते. पण या कंपनीच्या पॅकेटमध्ये फक्त 5 चिप्स येतात. तर पूर्ण पॅकेटची किंमत ५६ डॉलर म्हणजेच ३,९९९३.६४ रूपये आहे आणि तसे बघायला गेलो तर वेफर्सच्या एका स्लाईसी किंमत ही ७८४.११ रूपये एवढी होते.

पण आता तुम्ही म्हणाल की हे वेफर्स एवढे महाग का बरे असतील? या वेफर्सच्या पॅकेटची पॅकिंग एखाद्या ज्वेलरी बॉक्ससारखीच आहे. त्यात पाच चिप्ससाठी वेगवेगळे खाचे आहेत. कंपनीच्या वेबसाइटला भेट दिली तर तुम्हाला या वेफर्सच्या पॅकिंग करतानाचे काही फोटो बघायला मिळतील.
याबाबत माहिती देताना सेंट एरिक्सचे ब्रॅन्ड मॅनेजर मार्कस फ्रियरी सांगतात की, आमच्या कंपनीच्या बीअरसोबत आम्हाला सर्व्ह करण्यासाठी त्याच्या तोडीचा एक खास स्नॅक्स हवा होता. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आणि जगातील सर्वात एक्सक्लूसिव्ह बटाट्याचे वेफर्स आम्ही तयार केले.

Matsutake mushrooms, Truffled seaweed, India Pale Ale wort, Crown Dill, Leksand onion, Almond potatoes from the Ammärnas region असे या खास वेफर्समध्ये पाच वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, ज्या प्रकारे हे वेफर्स तयार करण्यात आले आहेत, त्या वस्तू दुर्मिळ आहे. यात असलेल्या कांद्याची प्रजाती केवळ Leksand शहरात १८ मे ते १० ऑगस्ट दरम्यान तयार होते. हा खास प्रकारचा कांदा आहे.