पाकिस्तानमध्ये १५ ऑगस्ट काळा दिवस म्हणून जाहीर


नवी दिल्ली – १५ ऑगस्टला आपला देश स्वातंत्र झाला. सगळेच भारतीय या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात. पण पाकिस्तानचे याच दिवसाबाबत नापाक मनसुबे समोर आले आहेत. पाकिस्तान सरकारने १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून जाहीर करावा असे एक पत्रकच जारी केले आहे.

ही सूचना सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. कोणताही विशेष कार्यक्रम १५ ऑगस्टच्या दिवशी करायचा नाही. त्याचबरोबर या पत्रकात पाक सरकारने काश्मीरसंदर्भात आत्मियता असलेल्या बातम्या आणि व्हिडिओच प्रसारित करावेत असेही म्हटले आहे.

आपल्या देशाचा १४ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन आहे. आपल्या काश्मीरच्या एकतेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जावा असेही पाक सरकारने म्हटले आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणूनच दाखवला गेला पाहिजे. या दिवशी झेंडाही अर्ध्यावर आणावा. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या भूमिका काय आहेत हे दाखवणारे व्हिडिओज दाखवले जावेत. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका काय तेही स्पष्ट करावे असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment