गुलशन कुमार यांना गोळ्या घातल्यानंतर अबू सालेम 10 मिनिटं ऐकत होता किंचाळ्या


एकेकाळी ज्यूसच्या दुकानापासून करिअरची सुरूवात करून कँसेट किंग बनणाऱ्या गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे 1956 ला झाला होता. टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हे असे व्यक्ती आहेत, ज्यांना बॉलिवूडच नाहीतर सर्वसामान्य व्यक्ती देखील विसरू शकलेला नाही. कँसेट साम्राज्य उभ केल्याने ते लोकांचा चर्चेचा विषय झाले होते. मात्र त्यांना आणखी एका कारणामुळे लक्षात ठेवले जाते ते म्हणजे त्यांची झालेली हत्या. आज गुलशन कुमार यांची पुण्यतिथी आहे.

गुलशन कुमार यांचे चाहते आजचा दिवस कधीच विसरू शकत नाहीत. 1997 ला आजच्याच दिवशी त्यांची वाईट पध्दतीने गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

दिल्लीच्या पंजाबी कुटूंबात जन्मलेल्या गुलशन कुमार हे लहानपणापासूनच मोठी स्वप्न बघत असे. गुलशन कुमार यांना ज्युसच्या दुकान टाकत पैसे कमवण्यास सुरूवात केली होती. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे ते ओरिजनल गाण्यांना स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करत कमी किंमतीत विकत असे. त्यांना दिल्लीमध्ये त्यांचे स्वप्न पुर्ण होताना दिसत नसल्याने त्यांनी अखेर मुंबईल येण्याचा निर्णय घेतला.

गुलशन कुमार खूप तेजीने प्रगती करत होते आणि त्यामुळेच त्यांचे शत्रू बनण्यास सुरूवात झाली होती. एस हुसैन झैदीने त्यांचे पुस्तक My name is abu salem मध्ये सांगितले आहे की, अबू सालेमने गुलशन कुमार यांच्याकडून 10 करोड रूपयांची मागणी केली होती. मात्र गुलशन कुमार यांनी देण्यास मनाई केली. 12 ऑगस्ट 1997 ला मुंबईच्या जीतेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर 16 गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.

गुलशन कुमार यांनी नकार ते म्हटले होते की, एवढ्या पैशात तर मी वैष्णो देवी येथे भंडारा करेल. या गोष्टीवरून नाराज होत सलेमने शूटर राजाद्वारे गुलशन कुमार यांचा भरदिवसा हत्या घडून आणली. गुलशन कुमार यांना मारल्यानंतर शूटर राजाने आपला फोन 10 ते 15 सुरू ठेवला होता. जेणेकरून गुलशान कुमार यांच्या किंचाळ्या सालेम ऐकू शकेल.

एस. हुसैन झैदीने आपल्या पुस्तकात सांगितले की, गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर एका रिपोर्टरने अबू सालेमला याच्याबद्दल विचारले होते. त्यावर सालेमने उत्तर दिले की, ही हत्या लालकृष्ण आडवाणी यांनी केली आहे. त्यांना जाऊन विचारा.

गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर संपुर्ण जबाबदारी त्यांचा मुलगा भूषण कूमारवर आली होती. भूषणने आपल्या वडिलांचा व्यवसाय संभाळत टी-सिरीजला शिखरावर नेऊन पोहचवले. आज टी-सिरीज भारतातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी आहे.

Leave a Comment