विधानसभेत नेत्याने केलेल्या कारनाम्यामुळे सदस्यांना लागले पळायला


गोंधळ घातल्यामुळे विधानसभा स्थगित करण्यात आल्याचे आपण नेहमी बघत असतो. मात्र केनियाच्या विधानसभा ज्या कारणामुळे स्थगित झाली, त्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले. मागील आठवड्यात तेथील होमा वे काउंटी अलेंबलीमध्ये कोणत्या तरी सदस्याने घाण गँस सोडल्याने विधानसभेतील कार्यवाही काही काळासाठी स्थगित करण्यात आली.

विधानसभेत कोणत्यातरी मुद्दावरून पक्ष-विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. त्याच वेळी तेथे घाण गँस पसरली. त्यानंतर सर्व सदस्यांनी नाक दाबत, कागदपत्रे उचलत तेथून पळ काढला. गँसचा वास एवढा घाण होता की, तेथे थांबणे अवघड होते. यावेळी सदस्यांनी एक दुसऱ्यावर गँस सोडल्याचा आरोप केला. जुलियस गाया नावाच्या एका सदस्याने स्पीकरला सांगितले की, आपल्या पैकीच कोणीतरी हे कृत्य केले आहे.

या घटनेनंतर स्पीकर एडविन काकाछ यांनी सदनाची कार्यवाही 10 मिनिटांसाठी स्थगित केली. त्यानंतर स्पीकरने तेथील कर्मचाऱ्यांना सदनात रूम फ्रेशनर मारण्यास सांगितले. घाण वास कमी झाल्यानंतर सर्व सदस्य आपआपल्या स्थानावर येऊन बसले व कार्यवाही पुन्हा सुरू झाली.

Leave a Comment