लाल रंगात रंगणार अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस


ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील पहिला सामना जिंकला असून त्यांनी या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पुनरागमानंतर दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने शतके केली. तसेच इंग्लंडचा डाव नाथन लायनच्या गोलंदाजीसमोर ढासळला.

14 ऑगस्टपासून दुसरा सामना सुरू होणार आहे. लॉर्ड़ स्टेडियम या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगात रंगणार आहे. फक्त स्टेडियमच नाही तर लाल जर्सीत दोन्ही संघातील खेळाडूसुद्धा दिसणार आहेत. लाल रंगाचे कपडे फुफ्फुसाच्या कर्करोगाची जनजागृती करण्यासाठी घालणार आहेत.

फुफ्फुसाचा कर्करोग इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसची पत्नी रूथ स्ट्रॉसला झाला होता. या आजाराने गेल्या वर्षी तिचे निधन झाले. रुथच्या नावाने त्यानंतर फाऊंडेशन सुरू केले.

लॉर्ड्सवर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे घातलेले प्रेक्षक रूथ फाऊंडेशनला निधी मिळण्यासाठी दिसणार आहेत. हा उपक्रम इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब यांच्यामार्फत संयुक्तरित्या राबवला जाणार आहे.

लॉर्ड्सवर फक्त रुथला आदरांजली वाहण्यासाठी लागल रंग वापरण्यात येणार नाही तर मिळणाऱ्या निधीतून दुर्मिळ आजाराबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. आजारावरील उपचार शोधणाऱ्या संशोधनासाठी हा निधी खर्च करण्यात येईल असे अँड्र्यू स्ट्रॉसने म्हटले आहे.

Leave a Comment