बजरंग पुनियाचे कलम ३७०वरील ट्विट, एकदम हिट


भारताचा पहिलवान बजरंग पुनिया याने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने हटविल्यानंतर शुक्रावारी त्यासंदर्भात केलेले ट्विट देशभरात कमालीचे हिट ठरले असून त्यामुळे देशवासीयांच्या मनात पुनियाने स्थान मिळविले आहे. हे कलम रद्द केल्यानंतर जुने, जाणते आणि अनुभवी राजकीय नेते वादग्रस्त विधाने करत सुटले असताना पुनियाचे हे ट्विट देशवासियांना शांती देणारे आणि पुनिया बद्दल अभिमान वाटावा असे ठरले आहे. त्याच्या या ट्विटवर त्याचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे.

बजरंग या ट्विटमध्ये लिहितो, ना काश्मीरमे ससुराल चाहिये, ना ही वाहांपर मकान चाहिये. बस कोई फौजी शरीर तिरंगेमें लिपटकर न आये, अब ऐसा हिंदुस्थान चाहिये / जयहिंद, जय भारत.


हे कलम रद्द करण्याचे विधेयक संसदेत संमत झाले तेव्हाच हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एका सभेत बोलताना हरियानवी मुलांना आता काश्मिरी मुलींची लग्न करता येईल असे विधान केले होते तर भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनीही काश्मिरी गोऱ्या मुलींशी लग्न करण्याचा अधिकार मिळालाय त्याचा लाभ उठावा असे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर पुनियाचे ट्विट विशेष ठळकपणे जनतेचा समोर आले आहे.

Leave a Comment