या देशात पिता करू शकतो आपल्याच मुलीशी लग्न


जगामध्ये असे अनेक देश आहेत, जे आपल्या वेगळ्या प्रथा आणि कायद्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. अशाच वेगळ्या प्रथा आणि कायद्यांसाठी इराण हा देश आहे. येथे लग्न करण्यापासून ते संबंध ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टींवर प्रतिबंध आहेत.

इराणमध्ये महिलांना दुसऱ्या पुरूषाशी हात मिळवणे देखील गुन्हा समजले जाते. जर एखादी महिला दुसऱ्या पुरूषाशी हात मिळवताना आढळून आली तर तिला अटक केले जाते. काही दिवसांपुर्वीच इराणच्या महिला वॉलीबॉल टीमने ग्लोबल चँलेज टुर्नामेंटच्या अंडर-23 प्रकारात विजय मिळवला होता. मात्र विजयानंतर देखील महिला खेळाडू टीमच्या पुरूष कोचबरोबर हात मिळवू शकल्या नाहीत. कोचने खेळाडूंशी एका प्लिपबोर्डच्या मदतीने हात मिळवत विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

येथे महिलांना टाइट कपडे घालणे गुन्हा समजले जाते. तसेच येथे असा नियम आहे की, महिला आपल्या पतीला शारिरीक संबंध बनवण्यापासून थांबवू शकत नाही.

या देशात महिला स्टेडिअममध्ये जाऊन पुरूषांचे खेळ बघू शकत नाही. तसेच हिजाब परिधान न केल्यास महिलांना दोन महिन्यांची जेल होऊ शकते.

इराणमध्ये केवळ पुरूषांनाच घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. येथे महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही. तसेच नवऱ्याच्या समतीशिवाय महिला काम देखील करू शकत नाही.

इराणमध्ये रस्त्यावर उभे राहून गाणे गाने हा देखील गुन्हा आहे. त्याचबरोबर या देशातील लोकांना टाई घालण्यास देखील मनाई आहे.

इराणचा सर्वाधिक धक्कादायक कायदा म्हणजे येथे पिता आपल्या मुलीशी देखील विवाह करू शकतो. 2013 मध्ये हा कायदा पास करण्यात आला आहे. कायद्यानुसार, कोणताही पिता दत्तक घेतलेल्या मुलीशी लग्न करू शकतो. यासाठी अट एवढीच आहे की, मुलीचे वय कमीत कमी 13 वर्ष असावे.

Leave a Comment