गिर्यारोहकांनी शोधला 5200 मीटर उंचीवरील तलाव


काही दिवसांपुर्वी नेपाळमधील मनंग जिल्ह्यात शोधण्यात आलेला काजिन सारा तलाव हा जगातील सर्वात उंचीवर असल्याचा रेकॉर्ड नावावर करू शकतो. हा तलाव 5200 मीटर उंचीवर आहे. हिमालय क्षेत्रात 4919 मीटर उंचीवर असणारा तिलिचो तलाव सध्या जगातील सर्वात उंचावर असणारा तलाव आहे.
मनांग जिल्ह्यातील काजिनचा काही दिवसांपुर्वीच गिर्यारोहकांनी शोध लावला आहे. 2020 पर्यंत हा तलाव पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

चामे ग्रामीण नगर पालिका अध्यक्ष लोकेंद्र घले यांनी सांगितले की, हा तलाव 5200 मीटर उंचीवर आहे. मात्र अद्याप यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेला नाही. हा तलाव जवळपास 1500 मीटर लांब आणि 600 मीटर रूंद आहे.
5000 मीटर उंचीवर असलेला हा तलाव अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाल्यावर जगातील सर्वात उंचावर असलेला तलाव असेल. या तलावाची निर्मिती हिमालयातील बर्फ वितळल्याने झाले आहे. येथे पोहचण्यासाठी तब्ब्ल 18 तासांची चढाई करावी लागते.

Leave a Comment