पाकिस्तानी मुलीने विचारलेल्या प्रश्नाला प्रियंका चोप्राने दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूडचे कलाकार अनेक वेळा राजकीय प्रश्नांना उत्तरे देणे टाळतात. मात्र एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रियंका चोप्राने एका पाकिस्तानी मुलीने विचारलेल्या प्रश्नाला अगदी सहज उत्तर दिले. शनिवारी ब्युटीकॉल लाँस एंजिलेस येथील कार्यक्रमात प्रियंका चोप्रा बोलत असताना ही घटना घडली.

मुलीने प्रियंका चोप्राने केलेल्या एका ट्विटमुळे भडकली. प्रियंकाने मार्चमध्ये भारतीय सैन्याची प्रशंसा केली होती. यावरून मुलीने प्रियंकाच्या युनायटेड नेशन्सची गुडविल अँम्बेस्टर असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पाकिस्तानी मुलगीने विचारले की, शांतता टिकवून ठेवण्यासाठी तुला युनायटेड नेशन्सची गुडविल अँम्बेस्टर बनवण्यात आले आहे. तू पाकिस्तानमध्ये न्युक्लियर वॉरला प्रोत्साहन देत आहात. तू यात पडायला नाही पाहिजे. माझ्या सारखे अनेक पाकिस्तानी लोकांना तू आवडतेस आणि तुझ्या बिझनेसमध्ये देखील मदत करतात.

मुलीचे बोलणे पुर्ण झाल्यावर प्रियंका उत्तर देते की, माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत आणि भारतीय आहे. युध्द ही अशी गोष्ट नाही की, जे मला खूप आवडते. पण मी एक राष्ट्रभक्त आहे. त्यामुळे जे लोक माझ्यावर प्रेम करतात, अशा लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते.

प्रियंका म्हणाली की, आपल्या सर्वांकडे एक मिडल ग्राउंड असते, ज्यावर आपण सर्वांनी चालले पाहिजे. ठीक तसेच, जसे तू करत आहेस. ज्याप्रमाणे तु माझ्यावर ओरडत आहेस… ओरडू नकोस. आपण सर्व येथे प्रेमासाठीच आलो आहोत.

Leave a Comment