परिक्षेच्या दिवशी झोपेतून उठला नाही नातू , आजीने बोलवले पोलिसांना ..पुढे काय झाले बघाच

सर्वसाधारणपणे आपण पोलिसांना कोणती तरी घटना घडल्यावर बोलत असतो. मात्र थायलंडमध्ये पोलिसांना अशा कामासाठी बोलवले की, ते वाचून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. थायलंडमध्ये परिक्षेच्या दिवशी नातू झोपेतून उठला नाही म्हणून, आजीने थेट पोलिसांनाच बोलवून घेतले.

बँकॉकमध्ये आजी आणि नातू राहतात. शुक्रवारी परिक्षेच्या दिवशी आजी नातवाला बराच वेळ झोपेतून उठवत होती मात्र तो काही झोपेतून उठवले नाही. अखेर आजीने थेट पोलिसांनाच बोलवून घेतले.

पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होत मुलाला उठवले व अभ्यासाविषयी समजवले. पोलिसांनी त्याला अभ्यासाचे महत्त्व पटवून दिल्यावर अखेर मुलाने त्या पोलिसाचे ऐकले.

त्यानंतर आजीने नातवाला परिक्षेसाठी तैयार केले व त्याला नवीन पेन देखील दिला. यानंतर स्वतः पोलिसाने त्या मुलाला आपल्या स्कूटरवर बसवून परिक्षेच्या ठिकाणी पोहचवले. या घटनेची माहिती थायलंड पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली.

Leave a Comment