अनुराग कश्यपची ट्विटरवरून एक्झिट

सडेतोड उत्तरे आणि बिंधासपणासाठी ओळखले जाणाऱ्या दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विटर सोडले आहे. कुटूंबाला आणि मुलीला मिळणाऱ्या धमक्यांमुळे अनुराग कश्यपने ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे.

अनुराग कश्यपने शेवटचे ट्विट केले की, जेव्हा तुमच्या आई-वडीलांना धमकीचे फोन येतात आणि तुमच्या मुलीला ऑनलाइन धमक्या येतात, अशा वेळी कोणीच बोलत नाही. कोणतेही कारण किंवा तर्क आता शिल्लक नाही. गुंडाचे राज्य आहे आणि गुंडगिरीच जगण्याची नवीन पध्दत आहे. सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा.  तुम्हाला यश आणि सुख मिळो. हे माझे शेवटचे ट्विट असून, मी ट्विटर सोडत आहे. जर मी न घाबरता बोलू शकत नाही तर मी बोलतच नाही. गुड बाय.

अनुराग कश्यपने ट्विटर सोडल्यावर अनेकांनी दुख व्यक्त केले आहे. अनेकांनी हे योग्य नसल्याचे देखील म्हटले आहे.

काही दिवसांपुर्वीच अनुराग कश्यपने केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्याचबरोबर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली होती. यावरून त्याला ट्रोल देखील करण्यात आले होते.

तसेच याआधील मॉब लिचिंग सदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्यांच्या यादीत देखील अनुराग कश्यपचे नाव येते, यावरून देखील त्याला ट्रोल करण्यात आले होते.

Leave a Comment