भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात ‘रांगडा’ खेळाडू


नवी दिल्ली – शनिवारी (१० ऑगस्ट) भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या १३ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. ६ फूट ५ इंच उंच असलेल्या रहकीम कॉर्नवॉल याला या संघात संघात स्थान देण्यात आला आहे. कॉर्नवॉलला वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्याचे फळ मिळाले आहे. गेली ५ वर्षे त्याने दमदार कामगिरी करून दाखवल्यामुळे त्याला संघात स्थान त्याच्या कामगिरीच्या बळावर देण्यात आले असल्याचे वेस्ट इंडिजच्या हंगामी निवड समितीचे अध्यक्ष रॉबर्ट हेन्स यांनी स्पष्ट केले. पण क्रिकेटरसिकांना हा रांगडा खेळाडू आहे तरी कोण असा प्रश्न पडल्याचे दिसते आहे.

मूळचा अँटिग्वाचा रहकीम कॉर्नवॉल हा खेळाडू आहे. १ फेब्रुवारी १९९३ साली कॉर्नवॉलचा जन्म झाला असून २६ वर्षीय कॉर्नवॉलची उंची सुमारे ६ फूट ५ इंच आहे तर अंदाजे ३०० पौंड त्याचे वजन आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि स्पिन गोलंदाजी करतो. क्रिकेटमधील मानवी पर्वत या टोपणनावानेही त्याला ओळखले जाते.

त्याने ५ वर्षांपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कॉर्नवेल याने तेव्हापासून वेस्ट इंडिज चॅम्पियनशीपमध्ये लीवार्ड आइसलँड्स हरिकेन्स संघाकडून आणि तसेच विंडिंज ए संघातून केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा झाला. २०१६ मध्ये भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजच्या अध्यक्षीय संघाकडून खेळताना एका डावात त्याने ५ बळी टिपले होते. आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५५ सामन्यांत २४ च्या सरासरीने धावा देत २६० बळी माघारी धाडले आहेत. याशिवाय, त्याने सुमारे २४ च्या सरासरीने फलंदाजी करत १ शतक आणि १३ अर्धशतके ठोकली आहेत.

Leave a Comment