…यामुळे हॉस्पिटलमध्ये आहे सुरेश रैना


नवी दिल्ली – नेदरलंडच्या अ‍ॅमस्टरडॅम येथील हॉस्पिटलमध्ये भारताचा डावखूरा फलंदाज सुरेश रैना याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट करुन दिली आहे. रैनाला मागील काही महिन्यांपासून गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

रैनावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला ४ ते ६ आठवड्यासाठी आराम करावा लागणार आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.


सुरेश रैनाने भारतीय संघाकडून १८ कसोटी, २२५ एकदिवसीय आणि ७८ टी- २० सामने खेळले आहेत. त्याने १८ कसोटी सामन्यातील ३१ डावांमध्ये खेळताना ७६८ धावा केल्या आहेत. तर २२६ एकदिवसीय सामन्यात त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा जमवल्या आहेत. यात ५ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. ७८ टी-२० सामन्यात खेळताना १६०४ धावा केल्या असून त्यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. इंडिअन प्रीमियर लीगमध्ये रैनाने १९३ सामने खेळले आहेत. त्याने यात ५३६८ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.

Leave a Comment