चक्क अमेरिकेचा बास्केटबॉलपटू आहे गरोदर!


नवी दिल्ली – सध्या सर्वत्रच डोप टेस्टच्या बातम्या वाचण्यात येत असून काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ याच्यावर डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यामुळे बंदी घालण्यात आली. पण, एक वेगळाच प्रकार अमेरिकेत समोर आला आहे. एका पुरुष खेळाडूची तिथे डोप टेस्ट घेण्यात आली. या चाचणीत तो चक्क गरोदर असल्याचे आढळून आला.


या खेळाडूचे नाव डी. जे. कूपर असे असून अमेरिकेचा तो बास्केटबॉलपटू आहे.या चाचणीपासून बचाव करण्यासाठी त्याने आपल्या प्रेयसीचे युरीन सँपल जमा केले. नव्या संघाकडून खेळण्यापूर्वी, त्याची डोप टेस्ट घेण्यात आली. कूपर त्यात चक्क गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या चूकीबद्दल आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशनने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. कूपरला त्यामुळे बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. ३१ ऑगस्ट पासून ही स्पर्धा सुरू होणार असून ४ जून २०२० पर्यंत कूपरची बंदी असणार आहे.

Leave a Comment