आता महिलांचे संरक्षण करणार या स्मार्ट बांगड्या


हैदराबाद – महिलांच्या सुरक्षेसाठी एक स्मार्ट बांगडी येथील एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने तयार केली आहे. महिला संकटात असल्याची माहिती ही बांगडी तिच्या परिवार, मित्र आणि जवळच्या पोलिस ठाण्यात एका मेसेजद्वारे देते. महिलेने बिकट प्रसंगामध्ये ही बांगडी विशिष्ट कोनात फिरवल्यास ही बांगडी सक्रिय होईल आणि लोकेशनसोबत मदतीचा मेसेज पाठवले.

ही बांगडी तयार करणाऱ्या हरीशने सांगितले, की जर महिलेला सेल्फ सिक्युरिटी डिव्हाइच्या एक्टिवेटशन दरम्यान कोणी पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याला बांगडीच्या बाहेरील आवरणामुळे जोरदार झटका देखील देईल. ही स्मार्ट बांगडी हरीशने त्याचा मित्र साई तेजाच्या मदतीने तयार केली आहे. हरीशने सांगितले, बाजारात अनेक डिव्हाइस महिलेच्या सुरक्षेसाठी उपलब्ध आहेत. पण स्मार्ट बांगडी या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. महिलेला सुरक्षिततेची पूर्ण जाणीव ही बांगडी करून देते.

हरीशने सांगितले, स्मार्ट बांगडी तयार करण्यामागे महिलांना सुरक्षा देणे हाच उद्देश होता. बलात्कार, अपहरण आणि महिलेंसोबत छेडछाडीच्या घटना आजकाल वाढत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी ही बांगडी मदत करेल. हा प्रकल्प पुढे नेऊन महिलांना संरक्षण द्यावे अशी आम्ही सरकारला विनंती करतो.

Leave a Comment