लोकसंख्या वाढवण्यासाठी हे सरकार देणार मोफत घर आणि 40 हजार रूपये

ग्रीसमधील एंतिकेथेरा आयलँडवर लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकारने एक खास ऑफर दिली आहे. शहराची लोकसंख्या वाढवण्यासाठी तुम्हाला मोफतमध्ये घर आणि जमीनीबरोबरच तीन वर्षांपर्यंत दर महिन्याला 565 डॉलर म्हणजेच 40 हजार रूपये मिळणार आहेत. हे आयलँड स्वच्छ पाणी पर्वतांसाठी प्रसिध्द आहे.

हे आयलँड 20 वर्ग किलोमीटर पर्यंत पसरलेले असून, येथे केवळ 24 लोक राहतात. सरकारला भिती आहे की, हे लोक देखील हा भाग सोडून जातील. त्यामुळेच येथील ऑर्थोडोक्स चर्च आणि सरकारने ही ऑफर दिली आहे.

आयलंडवर राहण्याची ऑफर काही लोकांना आवडली देखील आहे. आतापर्यंत 4 कुटूंबानी यासाठी अर्ज देखील केला आहे. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा देखील उघडल्या जाणार आहेत. शाळा उघडल्यानंतर आयलँडवर राहणाऱ्या लोकांना काहीप्रमाणात दिलासा मिळेल.

त्यांना आशा आहे की, पुन्हा लोक येथे राहायला येतील. आयलँडवरील पोतामोस गावामध्ये आता एकही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे बेकिंग, शेती, मासेमारी, कंन्स्ट्रक्शन करणाऱ्या लोकांना येथे बोलवले जात आहे.

स्थानिक काउंसिलचे अध्यक्ष आंद्रेज चेरचेलकिस यांच्यानुसार, कंन्सट्रक्शन, मासेमारी ही अशी कामे आहेत, ज्याद्वारे आम्ही चांगल्या कमाईचे आश्वासन देऊ शकतो. येथे राहणाऱ्या लोकांना केवळ सरकारच्या काही साध्या अटी मान्य कराव्या लागतील.

Leave a Comment