तब्बल पाचव्यांदा शाहरुखला ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल


आणखी एक मानाचा तुरा अभिनेता शाहरुख खानच्या शिरपेचात रोवला गेला आहे. शाहरुखचा ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन मेलबर्न येथे सुरू असलेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सन्मान करण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.

मेलबर्न येथील ‘ला ट्रोब’ विद्यापीठातून शाहरुखने ही पदवी मिळवली आहे. त्याला डॉक्टरेट पदवी त्याने केलेल्या सामाजिक कार्यासाठी बहाल करण्यात आली आहे.


आपल्या आईच्या नावे सुरू केलेल्या मीर संस्थेद्वारा शाहरुखने खूप सामाजिक कार्य केली आहेत. महिला सशक्तीकरण तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी या संस्थेद्वारा तो काम करत असतो. त्याला त्याच्या या कार्यासाठी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मेलबर्न येथे आयोजित ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये शाहरुखला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. १८ ऑगस्टपर्यंत हा सोहळा सुरु राहणार आहे.

Leave a Comment