पुढील 2 दशकांमध्ये या पाच नोकऱ्यांवर रोबोट काम करताना दिसणार


रोबोटिक्सच्या क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आधी रोबोट केवळ एक बटनाच्या आधारावर मशीनप्रमाणे काम करायचे. मात्र आता रोबोट मनुष्याप्रमाणे विचार देखील करू लागले आहेत. यामागे पुर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे योगदान आहे. यामुळे रोबोट मनुष्याप्रमाणे बोलत आहेत, प्रश्न विचारत आहेत. मात्र हेच रोबोट भविष्यात मनुष्यासाठी धोकादायक ठरणार आहेत. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने दावा केला आहे की, पुढील दोन दशकांमध्ये अमेरिकेतील 47 टक्के नोकऱ्या या ऑटोमँटिक होतील अर्थात हे काम रोबोट करत असतील. चला तर मग जाणून घेऊया की, भविष्यात रोबोट कोणती कामे करू शकतात.

डाटा मँनेजमेंट/ अकाउंट  –
हे रोबोट सर्वात आधी डाटा मँनेजमेंट क्षेत्रावर ताबा मिळवतील. जर तुम्ही एक्सेलवर काम करत असाल, तर सर्वात आधी तुमची नोकरी धोक्यात आहे. रिपोर्टनुसार, रोबोट सर्वात आधी याप्रकारचे काम हातात घेतील. एक्सेल सीट किंवा डाटा मँनेजमेंटचे काम ते अधिक चांगले व जलद करतील. डाटा प्रोसेसिंगचे काम रोबोट चांगल्याप्रकारे करू शकतो. त्यामुळे रोबोटला अकाउंटिंगच्या कामासाठी ठेवले जाऊ शकते.

हेल्पर/सेल्सपर्सन/सप्लाई –
जर तुम्ही सेल्सपर्सन असाल अथवा बनण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. अनेक देशांमध्ये सप्लाईचे काम रोबोट आधीपासूनच करत आहेत. तसेच अनेक मॉलमध्ये रोबोट सेल्सपर्सनचे काम देखील करत आहेत. अनेक विमानतळांवर रोबोट प्रवाशांचे स्वागत करताना, त्यांना मदत करताना देखील दिसतात.

लेखक/पत्रकार/अनाउंसर
जर तुम्ही देखील या तीन पैकी एक बनण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नक्कीच दुसरा विचार केला पाहिजे. चीनमध्ये तर रोबोटने न्यूज अँकरचे काम देखील केले आहे. रिपोर्ट लिहिण्याचे काम रोबोट सहज करू शकतात. वाचून बोलणे हे देखील रोबोटसाठी सहज शक्य आहे. याशिवाय क्रिएटिव रायटिंग देखील रोबोट करू शकतात.

डॉक्टर –
सध्या जगाची लोकसंख्या 7.3 बिलियन असून, 2030 पर्यंत ती 8.5 पर्यंत पोहचेल. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकसंख्येसाठी डॉक्टरांची देखील आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी सर्जरी सारखी काम रोबोट करू लागले आहेत. येणाऱ्या काळात मेडिकल क्षेत्रात देखील रोबोट ताबा मिळवू शकतात.

ऑफिस वर्क –
क्लार्क अथवा ऑफिस वर्क असेल तर मनुष्याच्या तुलनेत रोबोट हे काम अधिक जलद करतात. लायब्रेरीपासून ते ऑफिसपर्यंतची सर्व कामे रोबोट करू शकतात. कॉल सेंटरमध्ये देखील तांत्रिक मदतीसाठी असणाऱ्या लोकांच्या जागी रोबोट दिसतील. आता देखील अनेक ठिकाणी रोबोटप्रमाणेच बोलताना दिसतात. त्यामुळे येणाऱ्या काळात रोबोट हे काम सहज करू शकतोत. मागील वर्षीच गुगलने डेमो दाखवला होता की, कशाप्रकारे गुगल असिस्टंट ग्राहकांची मदत करत आहे.

रोबोटपासून नोकऱ्या वाचवण्यासाठी करा हे काम –
कविता लेखन –
जगामध्ये मनुष्यच एकमेव असा सजीव आहे जो काहीही करू शकतो. रोबोटला देखील मनुष्यानेच बनवले आहे. मनुष्य कोणत्याही गोष्टीत रोबोटपेक्षा अधिक क्रिएटिव आहे. क्रिएटिव असण्याबरोबरच मनुष्य कल्पना करू शकतो. ज्यामुळे तो कविता, कथा लिहू शकतो. मात्र रोबोट असे करू शकत नाही. त्यामुळे रोबोटने तुमची जागा घेतली तरी तुम्ही कवी अथवा लेखक बनू शकता.

तंत्रज्ञानाची माहिती –
जगामधील सर्व रोबोट हे आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरती काम करतात. मात्र मनुष्याएवढा ते विचार करू शकत नाहीत. त्यामुळे रोबोटला नियंत्रणात ठेवण्यासाठी लोकांची आवश्यकता भासेल. त्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीतील एक्सपर्ट बनू शकता. तंत्रज्ञानामध्ये काम करू शकता.

Leave a Comment