या सात शहरांमध्ये लोकांच्या मृत्यूवर आहे बंदी


जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला मारले तर त्याला शिक्षा दिली जाते. मात्र जगांमध्ये असे अनेक शहरं आहेत, जेथे नैसर्गिक मृत्यूवर देखील बंदी आहे. मृत्यू तर कोणत्याही व्यक्तीला येऊ शकतो, मात्र असे असले तरी देखील या देशांमध्ये मृत्यूवर बंदी आहे. चला तर मग जाणून घेऊया हे सात देश कोणते आहेत आणि या ठिकाणी मृत्यूवर का बंदी आहे.

सेलिया-इटली –
2015 मध्ये इटलीच्या सेलिया या शहरांमध्ये केवळ 537 लोकच बाकी होते. यामधील अधिकतर लोकांचे वय 65 पेक्षा अधिक होते. त्यामध्ये येथील महापौरांनी लोकांना आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले होते व वेळोवेळी आरोग्याची तपासणी करण्यास देखील सांगितले होते. असे केले नाही तर दंड आकारण्यात येईल असेही सांगितले होते. हे नियम लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व शहराला वाचवण्यासाठीबनवण्यात आले होते.

कुंगनॉक्स – फ्रांस
फ्रांसच्या या गावामध्ये केवळ दोनच दफनभूमी आहेत व येथे केवळ 17 लोकांनाच दफन करण्याची जागा बाकी आहे. त्यामुळे 2007 पासूनच या गावामध्ये लोकांच्या मृत्यूवर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणाचा मृत्यू होणार असेल तर त्याला आधीच दुसऱ्या गावामध्ये पाठवले जाते.

सँरपोरनेक्स-फ्रांस
कुंगनॉक्स शहरापासून प्रेरणा घेत येथील महापौरांनी देखील लोकांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. येथील दफनभूमीत देखील केवळ 260 लोकांनाच दफन करण्याची जागा शिल्लक आहे.

ब्रिटीबा – ब्राझील
2005 मध्ये या शहराच्या महापौरांनी लोकांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. येथील कैथोलिक चर्चने दफनभूमीमध्ये जागा नसल्याचे म्हटले होते. मात्र 2010 मध्ये येथे नवीन दफनभूमी उभारण्यात आली.

लँनजोरन – स्पेन
1999 मध्ये दक्षिण स्पेनच्या या शहरात महापौरांना दफनभूमीची जागा कमी राहिल्याचे लक्षात आले.  त्यामुळे जोपर्यंत नवीन दफनभूमीची व्यवस्था होत नाही तोपर्यंत येथे लोकांच्या मृत्यूवर बंदी घालण्यात आली होती.

लाँगएअरबेन – नॉर्वे
नार्वेचे हे शहर बर्फाने झाकलेले आहे. त्यामुळे येथे दफन केलेले शव बर्फामुळे सडत नाहीत. याकारणामुळे शहरात अनेक आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे जर कोणताही व्यक्ती आजारी पडला अथवा त्याचा मृत्यू होणार असेल तर त्याला दुसऱ्या शहरात हलवले जाते.

2012 मध्ये या शहरातील लोकांनी शेजारील शहर नेपल्सची दफनभूमी वापरण्याचा निर्णय घेतला. कारण या शहरातील दफनभूमीसाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. नेपल्स शहरात मात्र आजुबाजूंच्या शवांचे दफन करण्यासाठी अधिक पैसे आकारले जातात.

Leave a Comment