हाशिम आमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास ‘थांबला’


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम आमलाचा प्रवास थांबला असून त्याने तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर आफ्रिकेच्या आणखी एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्ती स्विकारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला आमलाने आपला निर्णय कळवला आहे.


हाशिम आमलाला इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. या स्पर्धेत आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर फेकला गेला. आफ्रिकेच्या संघात या निराशाजनक कामगिरीनंतर सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. मी माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकलो, नवीन मित्र बनवले आणि ज्या लढाऊ बाण्यासाठी आफ्रिकेचा संघ ओळखला जातो याचा मला कायम अभिमान राहिल, असे विचार हाशिम आमलाने निवृत्ती जाहीर करताना मांडले.

Leave a Comment