मराठी रंगभूमीवर परेश रावल यांचे पदार्पण


लवकरच मराठी नाट्यक्षेत्रात बॉलिवूडचे दमदार अभिनेते परेश रावल पदार्पण करत आहेत. त्यांच्या ‘महारथी’ हे मूळ गुजराती नाटकाचे मराठीत रुपांतर होत असून या मराठी नाटकात परेश रावल अभिनय करणार नसून ते फक्त याची निर्मिती करणार आहेत.

‘महारथी’ या नाटकाच्या निमित्ताने एकोणीस वर्षांनंतर मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये सातत्यानं दिसणारा सचित पाटील रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. तो ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ निर्मित या नाटकात मुख्य भूमिकेत आहे. हे नाटक येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सचित या नाटकात सिनेविश्वात काम करणाऱ्या महत्त्वाकांक्षेतून इंदूरहून मुंबईला आलेल्या एका तरुणाची भूमिका साकारत आहे. तो एका श्रीमंत सिनेनिर्मात्याकडे नोकरीला लागतो. हे नाटक त्याच तरुणाची महत्त्वाकांक्षा आणि निर्मात्याच्या बंगल्यातील गूढ उलगडणार आहे.

Leave a Comment