आता इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅपवरही बुमरँग फिचर


आपल्या युझर्ससाठी सर्वाधिक प्रसिद्ध मेसेंजर अॅप असलेले व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवीन अपडेट देत असते. व्हॉट्सअॅप सध्यस्थितीत आणखी काही मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. आता व्हॉट्सअॅपवर लवकरच बुमरँग (Boomerang) सारखे फीचर व्हॉट्सअॅप युझर्संना मिळण्याची शक्यता आहे. व्हिडीओ प्रस्तुतीचे Boomerang नावाचे फीचर सध्या इंस्टाग्रामवर दिले गेले आहे. वेगवेगळे शॉर्ट व्हिडीओ बनविण्यासाठी या फीचरचा वापर केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार या नव्या फीचरचे अपडेट लवकरच व्हॉट्सअॅपवर येऊ शकतात. Boomerang फीचर Gif फाईलमध्ये व्हिडीओ बनवण्याच्या पर्यायासह येण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपवर Boomerang साठी 7 सेकंदाची मर्यादा असू शकते. व्हॉट्सअॅपच्या एका अकाऊंटवरून यापूर्वी अनेक स्मार्टफोनमध्ये वापरासंदर्भातील अपडेट येणार असल्याची देखील माहिती मिळाली होती. यामुळे वापरकर्त्याला एका नंबरवरूनच दोन किंवा अधिक स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप चालवता येणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपची चॅट हिस्ट्री देखील या दोन्ही डिव्हाईसमध्ये कनेक्ट होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनमध्ये या नव्या फीचरमुळे काहीही परिणाम होणार नसल्याचे देखील स्पष्ट आहे.

Leave a Comment