कोलकात्यातील हुगळी नदीखालून देशातील पहिली अंडरवॉटर ट्रेन


नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील हुगळी नदीखालून लवकरच देशातील नागरिकांना ट्रेन धावताना पाहायला मिळणार आहे. या रेल्वे लाईनचे काम जवळपास पूर्ण होत आले असून यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून दिली असून यासंदर्भातील एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.


या व्हिडीओमधून सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन जवळपास तयार असल्याचे सांगण्यात आले. तसेच दोन टप्प्यांमध्ये हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. लवकरच प्रवाशांसाठी त्यातील पहिला टप्पा खुला केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच या ट्रेनसाठी लावण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. ट्रेनला नदीखालून हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. लवकरच ही ट्रेन सुरू होणार असून उत्तम इंजिनिअरिंगचे हे प्रतिक असल्याचे पीयूष गोयल म्हणाले.

Leave a Comment