‘बडे बाप का बेटा’, जग्वार घेऊन दिली नाही नदीत ढकलून दिली बीएमडब्ल्यू!


हरियाणा : उँचे लोग उँची पसंद अशा आशयाची म्हण आपल्याकडे प्रचिलीत आहे. त्यातच एखाद्या रईसजाद्याला आपल्यापैकी अनेकजण बडे बाप का बेटा, असे म्हणताना आपण पाहिले आहे. याचाच काहीसा प्रत्यय हरियाणामधील यमुनानगरमध्ये आला आहे. येथील एका तरुणाने वडीलांनी जग्वार कार घेऊन द्यायला नकार दिला म्हणून आपली बीएमडब्ल्यू कार चक्क नदीत ढकलून दिली.

सध्या सोशल मीडियात घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाण्यात ही कार लांबवर वाहत जाऊन अडकली. मग ती बाहेर काढण्यासाठी खटाटोप करावा लागला. या तरुणाची आता पोलीस चौकशी करत आहेत. महागड्या कारची खूपच क्रेझ पंजाब आणि हरियाणामधील तरुणांमध्ये आहे. या राज्यात या महागड्या गाड्यांबद्दल गाणीही बनत आहेत. तरुण या प्रलोभनांना बळी पडून आपला गाड्यांचा शौक पुरा करण्यासाठी आईवडिलांना हैराण करतात. असेच काहीसे उदाहरण यमुना नगरमध्येही पाहायला मिळाले.

40 ते 50 लाखांपासून जग्वार गाडीची किंमत सुरू होते. काही महागड्या गाड्यांची किंमत तर कोट्यवधींच्या घरात आहेत. अशा महागड्या गाड्या पंजाब- हरियाणामध्ये गावागावांत पाहायला मिळतात. अशा गाड्या घेऊन मित्रमंडळींमध्ये मिरवण्याचा नादच येथील तरुणांना जडला आहे. ज्या जग्वार कारसाठी या तरुणाने बीएमडब्ल्यू कार पाण्यात ढकलून दिली ती गाडीही तेवढीच महागडी आहे. 30 ते 35 लाख रुपये या गाडीसाठी मोजावे लागतात. या सगळ्या लक्झरी कार आहेत. या तरुणाला वडिलांनी बीएमडब्ल्यू कार घेऊन दिली हीच काही छोटी गोष्ट नव्हती आणि जग्वार कारसाठी त्याने बीएमडब्ल्यू कार चक्क पाण्यात ढकलून दिली.

Leave a Comment