बाजेवरची ही खास कलाकारी झाली व्हायरल


सोशल मिडीयावर बाज विणताना एका हरियानवी कलाकाराने केलेली कलाकारी वेगाने व्हायरल झाली आहे. या विणकामाच्या माध्यमातून या अज्ञात कलाकाराने केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० व कलम ३५ ए रद्द करण्याचे विधेयक संमत करून घेतल्याचा आनंद व्यक्त केला आहे. आदित्य चौधरी यांनी हे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.


या बाजेचे विणकाम करताना या कलाकाराने ५-८-२०१९, धारा ३७०, ३५ ए हटाया गया अशी अक्षरे मोठ्या खुबीने विणलेली दिसत आहेत. हे विणकाम कुणी केलेय ते स्पष्ट केले गेलेले नाही मात्र या प्रकारच्या विणकामाच्या पद्धतीला कसुनी कलाकारी असे म्हटले जाते असे नमूद केले गेले आहे. हे फोटो पाहणाऱ्या नेटकरयानी प्रतिक्रिया देताना या अज्ञात कलाकारावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Leave a Comment