फोटोसाठी ऑक्टोपस तोंडात धरणे पडले महागात, थेट हॉस्पिटलमध्ये झाली रवानगी


ऑक्टोपस तोंडात पकडून फोटो काढणे एका महिलेला चांगलेच महागत पडले आहे. ऑक्टोपस तोंडात धरून फोटो चांगला येईल हा विचार करणाऱ्या महिलेला थेट हॉस्पिटलमध्येच भरती करावे लागले आहे.

45 वर्षीय जेमी बिसेज्लिया वॉशिंग्टनजवळील डेर्बी येथील एका मासेमारी स्पर्धेत भाग घेतला होता. तेथेच असणाऱ्या काही मच्छीमारांनी ऑक्टोपस पकडला होता. डेर्बी येथे होणाऱ्या फोटो स्पर्धेसाठी तिने ऑक्टोपस तोंडात पकडून फोटो काढण्याचा निर्णय घेतला.

जेमी म्हणाले की, डेर्बी येथे होणाऱ्या फोटो स्पर्धेसाठी मी फोटो काढत होती. मात्र मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ऑक्टोपस तोंडात पकडण्याची मोठी चूक केली.

हा फोटो काढत असताना ऑक्टोपसने दोन वेळा महिलेचा चावा घेतला.


ती म्हणाली की, अचानक फोटो काढत असताना ऑक्टोपसने माझ्या गळ्याभोवती वेढा घातला आणि माझ्यावर हल्ला केला. फोटो काढणारे हे सर्व बघत होते व त्याच क्षणी हा फोटो काढण्यात आला.

ऑक्टोपसने चावल्यामुळे तिला एक त्रास तास होता. मात्र तरी देखील ती महिला हॉस्पिटलमध्ये गेली नाही. दोन दिवसांनी तिने पुन्हा मासेमारी करण्यास सुरूवात केली.

तिने सांगितले की, मला गिळता देखील येत नव्हते. डोळे उघडल्यावर माझ्यासमोर अंधारी येत असे.माझ्या चेहऱ्याचा डाव भाग, घसा, सर्व काही सुजले होते आणि मला एक प्रकारे माझा एक भाग पॅरलाईज्ड झाल्यासारखा वाटत होता. सध्या ती सुजलेल्या चेहऱ्यासाठी औषधे घेत आहेत.

ही चांगली कल्पना नाही. मी पुन्हा कधीच असे करणार नसल्याचे, देखील ती महिला म्हणाली.

Leave a Comment