8 वा महिना, 8 तारीख आणि 8 वाजता काय सांगणार मोदी देशवासियांना?


नवी दिल्ली – आज संध्याकाळी 8 वाजता देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. जम्मू काश्मीरला विषेश दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने रद्द केले आहे. तसेच राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतल्यानंतर सध्या तणावपूर्ण परिस्थिती जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या भाषणाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी जम्मू काश्मीर राज्याला विषेश दर्जा देणारे कलस ३७० केंद्र सरकारने रद्द केले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये याबाबतचे विधेयक मंजूर झाले आहे. काश्मीर राज्याचे या विधेयकासह दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याबाबतचे विधेयकही दोन्ही सभागृहात मंजूर झाले. त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. नरेंद्र मोदींनी याआधी २७ मार्च रोजी त्यांनी देशाला संबोधित केले होते. त्यावेळी भारताने एक उपग्रह क्षेपणास्त्राने उडवल्याची माहिती दिली होती. ही क्षमता भारताने मिळवल्याचे त्यांनी सांगितले होते.

Leave a Comment