असा आहे गौरी आणि शाहरुखचा मन्नत बंगला


किंग खान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानची बॉलिवूडमध्ये लोकप्रिय जोडी म्हणून ओळख आहे. एक ‘कपल गोल’ म्हणून देखील दोघेही मानले जातात. त्यातच जर चाहत्यांना आपल्या आवडीच्या कलाकारांची लाईफस्टाईल, त्यांच्या घराचे फोटो पाहायला मिळाले तर त्यांच्यासाठी ही आनंदाची पर्वणीच म्हणावी लागले. आपल्या आलिशान ‘मन्नत’ बंगल्यामध्ये गौरीने प्रसिद्ध मॅगझीन ‘वोग’साठी फोटोशूट केले आहेत. तिने यामधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


अनेक सिनेरसिक शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या आलिशान ‘मन्नत’ बंगल्यासमोर वाट पाहत असतात. यापूर्वी कधीही त्याच्या याच ‘मन्नत’चे समोर न आलेले फोटो गौरीने शेअर केले आहेत.


गौरी ही एक सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर असून तिने ‘मन्नत’ला तिच्या कल्पक दृष्टी आणि कलात्मकतेने सजवले आहे. तिने हे फोटो घरातील सुंदर व्यक्तींमुळे घर सुंदर बनते, असे कॅप्शन देत शेअर केले आहेत.


बॉलिवूडच्याही बऱ्याच कलाकारांची घरे गौरीने डिझाईन केली आहेत. तिनेच करण जोहरच्या मुलांची रूम सजवली होती. याशिवाय रणबीर कपूर, वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही घरांचे इंटिरियर तिने केले होते.

Leave a Comment