‘या’ अफगानी क्रिकेटपटूला सुषमा स्वराज यांनी दिली होती भारतीय नागरिकत्वाची ऑफर


मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६६ वर्षी ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे निधन झाले. त्यांना मंगळवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. स्वराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. तर त्यांच्याबाबतच्या आठवणी सोशल मिडीयावर जनसामान्यांनी शेअर केल्या. त्यातच सुषमा स्वराज यांनी अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याला भारतीय नागरिकत्व बहाल करण्याचे केलेले ट्विटदेखील पुन्हा एकदा चर्चेत आले.

राशिद खान याने दमदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात त्याने ४ षटकात १९ धावा देत ३ गडी टिपले होते. त्याचबरोबर ३४ धावांची तुफानी खेळी करत संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले होते. त्यानंतर राशिद खान याला भारताचे नागरिक करून घ्या. त्याचा भारताला खूप फायदा होईल, अशा आशयाचे ट्विट अनेक नेटकऱ्यांनी केले होते.

विशेष म्हणजे भारताच्या परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी त्यावेळी या ट्विटची दखल घेत राशिद खानला भारतीय नागरिकत्वाची ऑफर दिली होती. सगळे ट्विट मी वाचले असून परराष्ट्र मंत्रालयाच्या आखत्यारित नागरिकत्वाची कामे ही येतात, असे त्यांनी ट्विट केले होते.

Leave a Comment