हनिमूनचे फोटो पोस्ट करुन झाली नुसरत जहाँची फसगत


सध्या मालदीवमध्ये नवविवाहित व नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. नुसरत लग्नानंतर दोन महिन्यांनी हनिमूनला गेल्या आहेत. इन्स्टाग्रामवर बरेच फोटो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या नुसरत यांनी पोस्ट केले आहेत. पण काही नेटकऱ्यांना हे फोटो रुचले नाहीत. नेटकऱ्यांनी त्यांना संसदेत जाऊन काम करा, असा सल्ला दिला आहे.


ही काही पहिलीच वेळ नुसरत जहाँ ट्रोल होण्याची नाही. त्यांचा खासदार झाल्यानंतर एक जुना टिकटॉक व्हिडीओ चर्चेत आला होता आणि त्यांना त्यावरूनही ट्रोल करण्यात आले होते. त्यांनंतर नुसरत आणि खासदार मिमी चक्रवर्ती संसदेबाहेर काढलेल्या एका फोटोमुळेही ट्रोल झाल्या होत्या.

View this post on Instagram

Set the sun in style…..

A post shared by Nusrat (@nusratchirps) on


नुसरत जहाँ या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री असून त्यांनी कोलकात्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत टर्कीमध्ये लग्नगाठ बांधली. सर्वांत सुंदर खासदार असा किताब सोशल मीडियाने दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. नुसरत यांनी खासदार झाल्यानंतर लग्नाची घोषणा केली होती. त्यांनी लग्नासाठी शपथविधी सोहळा चुकवला होता.

View this post on Instagram

Like watching more sunsets than netflix..

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

View this post on Instagram

Every sunset promises a reset..

A post shared by Nusrat (@nusratchirps) on


गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान नुसरत व निखिल यांची भेट झाली. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment