या ठिकाणी उंदीर वाचवत आहेत हजारो लोकांचे प्राण


अनेकांना उंदरांची भिती वाटत असते अथवा किळस येत असते. उंदीर हा काही आवडणारा प्राणी नाहीच. मात्र जर तुम्हाला कोणी म्हटले तर उंदीर मनुष्याचे प्राण वाचत आहे ? तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र काही उंदीर नक्कीच तुमचे प्राण वाचवू शकतात. तानझेनियामधील एक संस्था 1997 पासून खास प्रजातीच्या उंदरांना सुरूंग आणि क्षयरोगाचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षण देत आहे.

अपोपो नावाची ही संस्था उंदराना जमीनीमध्ये गाडलेले सुरूंग शोधण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. या संस्थेने या उंदरांचे नाव हिरो रॅट असे ठेवले आहे.

जमीनीत पुरलेले सुरूंग हे दरवर्षी 4 हजार लोकांचे प्राण घेतात. तर क्षयरोगामुळे देखील अनेक अडचणी येत असतात. संस्थेनुसार, अफ्रिकेतील अनेक क्षयरोगांना योग्य उपचार मिळत नाहीत.

या उंदरांना कास भुसुरंग शोधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्या हलक्या वजनाने भुसुरंगांचा स्फोट देखील होत नाही. उंदरांना भूसुरंग शोधण्यासाठी जमीन  खणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच हा उंदीर 100 क्षयरोगांच्या थुंकीचे नमुने 20 मिनिटात तपासतो. या कामासाठी 11 जणांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले असून, एकाही उंदाराने आतापर्यंत चुकीचे काम केले नाही अथवा काम सोडलेले नाही.

 

Leave a Comment