मैदानात भावांचा तर सोशल मीडियात बहिणीचा धुमाकूळ!


वेस्ट इंडिज विरोधातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली. वेस्ट इंडिजने शेवटच्या टी20 सामन्यात दिलेले 146 धावांचे आव्हान 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात भारताने पूर्ण केले.

या सामन्यात यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतके झळकवली. भारताचा गोलंदाज दीपक चाहरने तीन षटकांत फक्त 4 धावा देत वेस्ट इंडिजचे तीन गडी बाद केले. त्याने केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे विंडीजला 146 धावांवर रोखता आले. या सामन्याचा सामनावीर दीपक चाहरला गौरविण्यात आले.


20 वर्षीय दीपक चहर याने आपला चुलत भाऊ राहुल चहर यासोबत एकाच दिवशी पदार्पण केले. भारतासाठी खेळणारी ही चौथी भावांची जोडी आहे.
पण सध्या सोशल मीडियावर चर्चा मालती चहरची आहे. दीपक आणि राहुलची मालती ही बहिण असून सोशल मीडियावर तिचे फोटो आयपीएलनंतर व्हायरल होऊ लागले.

View this post on Instagram

Let’s 🏊🏼‍♀️.

A post shared by Malti Chahar (@maltichahar) on


ही चेन्नई सुपरकिंग्ज आणि एमएस धोनीची मालती खुप मोठी फॅन असल्यामुळे क्रिकेट चाहती असलेल्या मालतीचे इन्स्टाग्रामवर 37 हजार चाहते आहेत.

View this post on Instagram

Go Goa Gone #vacation #mood #goa

A post shared by Malti Chahar (@maltichahar) on


उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारी मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. त्याचबरोबर ती सॉफ्टवेअर इंजिनिअर देखील आहे.
2014मध्ये मालतीने पहिल्यांदा मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश केला. दिल्लीमध्ये तिला फेमिना मिस इंडिया स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

View this post on Instagram

And the waiting _______?

A post shared by Malti Chahar (@maltichahar) on


डाबर टूथपेस्ट सारख्या जाहिरातींमध्ये मालतीने काम केले आहे. तसेच, 2017मध्ये मॅनीक्युअर नावाची तिची एक शॉर्ट फिल्मही रिलीज झाली होती. त्याचबरोबर 2017मध्ये तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते.

Leave a Comment