जेव्हा विक्रेता चेतन भगतला त्याचेच पुस्तक विकतो…. पुढे बघा काय होते


लेखक चेतन भगतची पुस्तकं अनेक लोकांना आवडतात. ऑनलाईनपासून ते स्टॉलवर देखील त्याची पुस्तके खरेदी केली जातात. रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवर देखील त्याची पुस्तके लोक खरेदी करतात. सोशल मीडियावर देखील चेतन भगत सक्रिय आहे. त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

चेतन भगतला एका पुस्तक विक्रेत्याने ट्रॅफिक सिग्नलवर त्याचेच पुस्तके विकले आहे. चेतनने कारमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

व्हिडीओमध्ये दिसते की, चेतन भगत कारमध्ये बसला आहे. पुस्तक विक्रेता पुस्तके घेऊन त्याच्याकडे येतो आणि पुस्तक खरेदी करण्यास सांगतो. तो मुलगा चेतनच्या हातात त्याचेच पुस्तक ठेऊन म्हणतो की, नवीन आले आहे. चांगली विक्री होत आहे.

चेतन भगत त्याला विचारतो की, ही कॉपी असली आहे की नकली ? त्यावर तो मुलगा  ऑनलाईन कॉपी असल्याचे उत्तर देतो.  चेतन भगत त्याला मुलाला विचारतो की, कसा लिहतो हा लेखक ?  यावर तो मुलगा देखील चांगला लिहतो असे हसत उत्तर देतो.

चेतन भगतने तो लेखक मीच आहे असे सांगितल्यावर त्या मुलाला देखील हसू येतो व तो हात मिळवतो.

चेतन भगतने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी पायरेसीला सपोर्ट नाही करत. मात्र मला माहित आहे की, या लोकांसाठी खाण्या-पिण्यासाठी हाच एक मार्ग आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले असून, 19 हजार पेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

Leave a Comment