अरे देवा! एका वर्षात तब्बल 22 पुरुषांची प्रसुती


ऑस्ट्रेलियामध्ये मागील वर्षी तब्बल 22 पुरूषांनी बाळाला जन्म दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ ह्युमन सर्विसने बर्थ रेटचा डाटा जाहीर केला. यामध्ये सांगण्यात आले आहे की, जन्म देणाऱ्यांमध्ये सर्व पुरूष हे ट्रांसजेंडर होते. या पुरूषांचे नाव आता मागील 10 वर्षांमध्ये बाळांना जन्म देणाऱ्या 228 जणांमध्ये जोडले गेले आहे.

याआधी 2009 पर्यंत यासंबंधी कोणतीही माहीती समोर आली नव्हती. मात्र लिंगबदल केल्यानंतर पुरूष बनलेल्या व्यक्तीने बाळांना जन्म दिल्याचे प्रकार समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे. लोकांनी म्हटले आहे की, जर कोणताही पुरूष बाळांना जन्म देत असेल तर तो कधीच पुरूष अर्थात मर्द नव्हता.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिवर्सिटीचे एक प्रोफेसर म्हणाले की, पुरूषार्थचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा आहे. लिंगबदल करणाऱ्याने याविषयी नक्कीच विचार केला असेल. मात्र त्यांचा विचार करण्याची पध्दत दुसऱ्यांप्रमाणेच रुढीवादी नसावी. कदाचित त्यांना बाळांना जन्म देण्यास काहीही अडचण नसावी. प्रोफेसर म्हणाले की, लोकांनी आता जेंडरबद्दल असलेले विचार बदलण्याची आता वेळ आली आहे.

Leave a Comment