काश्मिरी जनतेच्या सहवासात अजित डोवल


केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात काश्मीर संदर्भातले कलम ३७० रद्दबादल ठरविणारे विधेयक संमत करून घेतल्यानंतर त्याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल श्रीनगरला रवाना झाले. तेथे त्यांनी दहशतवादी कारवायांचा सर्वाधिक उपद्रव असलेल्या शोपिया मध्ये स्थानिकांशी संवाद साधून त्याच्यासोबत रस्त्यातील टपरीवर बिर्याणी खाल्ल्याचे व्हिडीओ प्रसारित होत आहेत. जम्मू काश्मीर मध्ये १४४ कलम अद्यापीही लागू आहे मात्र अजित डोवल या प्रदेशातील गल्ली बोळातून फिरून स्थानिकांशी संवाद साधत आहेत असे समजते.


या संदर्भात तीन व्हिडीओ सध्या ट्रेंड होत आहेत. डोवल टपरीवर स्थानिक लोकांसोबत बिर्याणी खात असल्याचे, प्रदेशात तैनात असलेल्या लष्करी जावानाशी बोलत असल्याचे आणि गावातील लोकांशी बोलत असल्याचे दिसत आहे. येथे अजित डोवल स्थानिकांना कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय तुमच्या भल्यासाठी असल्याचे सांगत आहेत. ते सांगतात, हे सारे तुमच्या हितासाठी असून चिंता करू नका. आरामात राहा. यातून सारे चांगलेच घडेल. तुम्ही, तुमची मुले आनंदात राहू शकाल. पुढे जाऊ शकाल, प्रगती करून घेऊ शकाल. चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करा.


डोवल एका सफरचंदाच्या बागेतही स्थानिकांसोबत संवाद साधताना व्हिडीओ मध्ये दिसत आहेत. डोवल यांनी राज्यपालांची भेट घेऊन तेथील सुरक्षा परिस्थितीची माहिती घेतली आहे तसेच प्रदेश पोलीस प्रमुखांना भेटून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेबाबत बुधवारी चर्चा केली आहे.

Leave a Comment