सुषमा स्वराज यांचे पार्थिव पंचत्वात विलिन


नवी दिल्ली – वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने माजी परराष्ट्र मंत्री तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज दुपारी १ वाजता अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. राजकीयसह सर्वच क्षेत्रातून सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले जात आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली तसेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील सहानुभूती व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंग यांच्यासह भाजपच्या सगळ्याच दिग्गजांची सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थिती होती. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, जे. पी. नड्डा यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती होती.

Leave a Comment