सुषमा स्वराज यांच्या पतीने लिहिले भावनिक पत्र


भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या या प्रवासात त्यांच्याबरोबर एक व्यक्ती कायम उभी होती ती म्हणजे त्यांचे पती. सुषमा स्वराज या राजकारणामध्ये असताना देखील त्यांनी पाठिंबा दिला होता व स्वराज यांनी राजकारणातून निवृत्ती घेताना देखील त्यांचे पती त्यांच्या पाठिशी होते.

मागील वर्षी, सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांचे पती स्वराज कौशल यांनी खास पत्र लिहिले होते.

पत्रात लिहिले की, ‘पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलास त्याबद्दल धन्यवाद. मला आठवत एकेकाळी मिल्खा सिंगला देखील धावणे थांबवावे लागले होते. ही शर्यत 41 वर्ष म्हणजेच 1977 पासून सुरू आहे. तू 11 निवडणुका लढवल्यास. एवढेच नाही तर 1977 पासून तू सर्वच निवडणुका लढवलेल्या आहेस. केवळ पक्षाने सांगितल्यामुळे 1991 आणि 2004 ची निवडणूक लढवली नव्हतीस.’

त्यांनी पुढे लिहिले की, ‘मँडम, तुमच्या मागे मी 46 वर्षांपासून धावत आहे. मी आता 19 वर्षांचा लहान मुलगा राहिलेलो नाही. मी सुध्दा आता थकलो आहे. धन्यवाद.’

सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्याच; पण त्याचबरोबर त्या भाजपच्या देखील पहिल्या मुख्यमंत्री होत्या. पुर्णवेळ परराष्ट्र मंत्री असणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

Leave a Comment