आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या महापौराची महिलांचे कपडे घालून काढली धिंड


निवडणुका जवळ आल्या की, नेतेमंडळी मोठमोठी आश्वासने देत असतात. मात्र निवडणूक जिंकली की हेच नेते पुन्हा तोंड दाखवायला देखील येत नाही. आश्वासने पुर्ण न झाल्यावर लोक प्रदर्शने करतात, मागण्या करतात. मात्र नेत्यांना याने काहीही फरक पडत नाही. मेक्सिकोमध्ये देखील असेच काहीसे घडले. मात्र येथील लोकांनी त्या नेत्याला अशी काही अद्दल घडवली की, तो आयुष्यभर विसरू शकणार नाही.

दक्षिण मेक्सिकोच्या ह्युक्सटन राज्यातील महापौर जेवियर जिमेनजचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते महिलांचे कपडे घातलेले दिसत आहेत. महापौरानी निवडणुकीत दिलेली आश्वासने पुर्ण न केल्याने तेथील जनतेने त्यांना महिलांची कपडे घालत पुर्ण शहरभर फिरवले. एवढेच नाही तर लोकांनी स्थानिक नगरपालिकेच्या अधिकाऱ्याबरोबरही तसेच केले.

फोटोबरोबरच महापौरांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोक हातात पोस्टर घेऊन फिरताना दिसत आहेत. महापौरांना बाजारात फिरवत असताना, हे लोक पोस्टर घेऊन त्यांच्या मागे चालत होते. पोस्टरवर लिहिले होते की, ह्यांनी आश्वासने पुर्ण केली नाहीत.

महापौरांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते की, शहरातील पाणी व्यवस्था सुधारण्यासाठी ते 1 करोड 8 लाख रूपयांचा निधी देतील. मात्र त्यांनी असे केले नाही.

स्थानिक लोकांचा आरोप आहे की, महापौरांनी घोटाळा केला आहे. लोकांनी चार दिवस त्यांना कैद देखील केले होते. त्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली की, जर पुढील वेळेस आश्वासन पाळले नाही तर त्यांचे मुंडन करण्यात येईल.

Leave a Comment