‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’मुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले मनीष तिवारी


सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचे अनेक विरोधी पक्षांनी देखील स्वागत केले.  मात्र काँग्रेस पक्ष या निर्णयाचे विरोधात असल्याचे दिसून आले.


याचबरोबर संसदेत कलम 370 बद्दल बोलताना काँग्रेसचा एकही खासदार अभ्यास करून आला नसल्याचेही दिसून आले. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी देखील आपल्या भाषणांमुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे.


मनीष तिवारी संसदेत भाषण देताना म्हणाले की, एक इंग्रजी पुस्तक आहे. कोणतीही गोष्ट ही काळी किंवा पाढंरी नसते. तर त्यामध्य फिफ्टी शेड्स असतात.


अमित शाह यांनी कलम 370 बद्दल काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल्यावर मनीष तिवारींच्या या उत्तराने संसदेत देखील सर्वांना हसू आले.

https://twitter.com/GitaVSKapoor/status/1158665038770495493

‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ ही एक इरोटिका कादंबरी आहे. मनीष तिवारी यांनी संसदेत याचा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले. फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे हे पुस्तक इल जमेसाने लिहिले असून, याच नावाने चित्रपट देखील रिलीज झालेला आहे. हा चित्रपट सॅम टेलर-जॉन्सनने दिग्दर्शित केला असून, डकोटा जॉन्सन आणि जेमी डोरनान यांची प्रमूख भूमिका आहे.

Leave a Comment