सोशल मीडियात होत आहे सईच्या बोल्ड फोटोशूटची चर्चा


आपल्या हटके अंदाजामुळे मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे आणि चर्चेसाठी तिने नुकतेच केले फोटोशूट कारणीभूत ठरत आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.


सईने नुकत्याच रिलीज झालेल्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटासाठी वजन कमी केले होते. तिने हे बोल्ड फोटोशूट या चित्रपटाच्या निमित्ताने केले होते. सईने तिच्या अभिनयाचा ठसा ‘दुनियादारी’, ‘सौ. शशी देवधर’, ‘बालक पालक’, ‘टाइम प्लीज’, ‘तू ही रे’, ‘वजनदार’, ‘वायझेड’, ‘क्लासमेट्स’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून उमटवला.


मी काही ठरवून बोल्ड अभिनेत्री ही ओळख मिळवलेली नाही. जशा भूमिका मला मिळाल्या, मी त्यावरून बोल्ड ठरले, असे सई एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. ‘गर्लफ्रेंड’नंतर सईच्या हातात आणखी तीन प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटात ती ललित प्रभाकरसोबत भूमिका साकारणार आहे.

Leave a Comment