स्टीलबर्ड हेल्मेट जम्मू काश्मीरमध्ये कारखाना काढणार


आशियातील सर्वात मोठी हेल्मेट कंपनी स्टीलबर्ड हायटेकने जम्मू काश्मीरमध्ये कारखाना काढण्याची तयारी दाखविली आहे. सोमवारी संसदेत केंद्र सरकारने जम्मू काश्मीर पुनर्गठन करताना कलम ३७० रद्दबातल ठरविल्याने आता या प्रदेशात देशातील अन्य उद्योजकांना गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्टीलबर्डचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कपूर यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले असून या निर्णयाची दीर्घ काळ प्रतीक्षा होती असे सांगितले. ते म्हणाले या निर्णयाने जम्मू काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. आत्तापर्यंत काश्मीरचे उद्योगक्षेत्र शेती आणि हस्तकला इतकेच मर्यादित होते. ऑक्टोबर मध्ये येथे गुंतवणूक परिषद होत आहे त्याला आम्ही उपस्थित राहणार असून येथे कारखाना काढण्याची योजना आखत आहोत.

कपूर म्हणाले नवीन गुंतवणूक कंपन्या स्थानिक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या सहकार्याने नवीन सुरवात करतील अशी आशा आहे. यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस चालना मिळेल.

Leave a Comment