उद्या येऊन तुमची १ रु. फी घेऊन जा


आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या नाविक दलातील अधिकारी आणि पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावले गेलेले कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणारे प्रसिद्ध अॅडव्होकेट हरीश साळवे यांना सुषमा स्वराज यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. सुषमा यांच्या निधनाची बातमी ऐकताच साळवे म्हणाले, माझा या वृत्तावर विश्वास बसत नाही. मंगळवारी हरीश साळवे सुषमा स्वराज यांच्या बरोबर फोनवरून बोलले होते.

साळवे म्हणाले सुषमा यांच्या मृत्युपूर्वी काही वेळ आम्ही फोनवरून चर्चा केली. तेव्हा त्यांनी बुधवारी दुपारी भेटायला या आणि कुलभूषण केस मधील तुमची १ रु. फी घेऊन जा असे सांगितले होते. सुषमा यांच्या निधनाने मी माझी मोठी बहिण गमावली आहे.

साळवे यांनी नाममात्र १ रु. प्रतीकात्मक फी घेऊन कुलभूषण यांची केस हेग न्यायालयात मांडली होती. या न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर पुन्हा विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला दिले होते. हा भारताचा मोठा विजय मानला जात होता.

Leave a Comment