आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सैनीला ताकीद


नवी दिल्ली – वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया सध्या मालिका खेळत असून भारताने शनिवारपासून सुरू झालेल्या टी-२० मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला. भारताच्या नवदीप सैनीने पहिल्या टी-२० सामन्यात दमदार प्रदर्शन करत संघाच्या विजयामध्ये मोठा वाटा उचलला. सैनीला याच सामन्यात एक मोठी ताकीद मिळाली आहे.

आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सैनीला ताकीद मिळाली आहे. त्याला आयसीसीच्या लेवल- १ च्या नियमानुसार दोषी ठरवण्यात आले आहे. सैनीने पहिल्या टी-२० च्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला बाद केल्यानंतर त्याला चूकीच्या पद्धतीने निरोप दिला होता.

या प्रकरणी आपली चूक सैनीने मान्य केली आहे. त्यामुळे त्याला फक्त ताकीद मिळाली आहे. आयसीसीच्या अनुच्छेद २.५ चे सैनीने उल्लंघन केले आहे. यामध्ये खेळाडू, कोचिंग स्टाफ यांच्याविरुद्ध अर्वाच्य भाषा किंवा हावभाव यांचा उपयोग करण्यास मनाई आहे.

Leave a Comment