आता अ‍ॅपच्या मदतीने कळणार आजारांची माहिती


जर तुम्हाला बरे वाटत नसेल, डोके दुखत असेल तर तुम्ही मोबाईल अ‍ॅपमध्ये आजाराची माहिती सांगू शकता. त्यानंतर मोबाईल तुमच्याशी एका डॉक्टरप्रमाणे संवाद साधेल. 20 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर हा अ‍ॅप तुमच्या आजारावर उपाय सांगेल. ऐडा नावाचा हा अ‍ॅप याचप्रकारे काम करत आहे.

हा अ‍ॅप बनवणारे डॅनियल नाथराथ म्हणाल की,  वेगळ्या पध्दतीद्वारे हा अ‍ॅप डॉक्टरची भूमिका बदलून टाकेल. मागील दहा वर्षात मी अनेक डॉक्टरांशी संवाद साधला आहे. चांगलेच डॉक्टर तेच असतात, जे विचार करतात की, योग्य तंत्रज्ञानाने अधिक चांगला इलाज होऊ शकतात. 8 वर्ष डॉक्टर्स आणि अ‍ॅप डेव्हलपर्सनी 1000 रिसर्चरकडून आलेल्या माहितीच्या आधारावर हा अ‍ॅप बनवला आहे.

एवेलीना टुएर्क सांगते की, आर्टिफिशल इंटेलीजेंसच्या वापराद्वारे हा अ‍ॅप युजर्सद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे अपडेट होत जाईल. तसेच हा अ‍ॅप वापरणाऱ्या सुरजने सांगितले की, मला नाकाचा त्रास होऊ लागला होता. अ‍ॅपला याबाबत सांगितल्यावर त्याने इंफेक्शन सांगितले. गंभीर आजार असल्यावर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतो.  नाकाच्या आजाराबद्दल माहिती मिळताच सुरज डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने देखील ते खरे असल्याचे सांगितले. डॉक्टर सुरेंद्र काला यांनी सांगितले की, मला नाही वाटत की, हा अ‍ॅप डॉक्टरांची जागा घेईल. कारण रूग्णासाठी क्लिनिकल तपासणी गरजेची आहे. मात्र हा उपयोग आहे.

डेव्हलपर्सचे म्हणणे आहे की, लवकरच हा अ‍ॅप कोणत्याही आजारावरील सुरूवातीच्या लक्षणांच्या आधारावर त्यावरील उपाय सांगेल. डँनियल नाथराथचे म्हणणे आहे की, ऑर्टिफिशियल इंटेलीजेंसचा फायदा भरपूर आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी होईल. अनेक प्रकरणात हा अ‍ॅप कोणत्याही आजाराची ओळख सुरूवातीच्या टप्प्यातच करेल. मात्र असे करण्यासाठी अ‍ॅपला युजर्सबरोबर अनेकवर्ष काम करावे लागेल व त्यांचा डाटा जमा करावा लागेल.

अ‍ॅप डेव्हलपर्सचे म्हणणे आहे की, युजर द्वारा देण्यात आलेला डाटा केवळ अ‍ॅपच्या विकासासाठी वापरण्यात येतो. मात्र आर्टिफिशिय इंटेलीजेंस संबंधी खाजगी माहिती जाण्याची देखील संभावना आहे. अ‍ॅप वापरण्यासाठी युजर्सला आपल्या जीवनीतील माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे खाजगी माहितीचा प्रश्न निर्माण होतो.

Leave a Comment