जाणून घ्या मुंग्या नेहमी एकामागोमाग रांगेतच का चालतात ?


पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी देवाने छोटे-मोठे अनेक जीव-जंतू बनवले आहेत. यामध्ये एक मुंगी देखील आहे. तुम्ही नेहमी बघितले असेल की, मुंग्या एका रांगेतच चालतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का त्या असे का करतात ? चला तर मग जाणून घेऊया या मागचे रहस्य काय आहे.

मुंगी ही एक सामाजिक प्राणी असून, ती कॉलोनीमध्ये राहते. त्यामध्ये एक राणी मुंगी, नर मुंगी आणि अनेक मादा मुंग्या असतात. राणी मुंगीच्या बाळांची संख्या लाखो असते.  नर मुंग्यांची ओळख म्हणजे त्यांना पंख असतात, तर मादा मुंग्यांची ओळख म्हणजे त्यांना पंख नसतात.

आपल्या लाल आणि काळ्या मुंग्यांबद्दलच माहिती असते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगभरात 12 हजार प्रजातींच्या मुंग्या आहेत. अंटार्कटिकासोडून जगातील प्रत्येक कोपऱ्यात मुंग्या सापडतात.

जगातील सर्वात खतरनाक मुंग्या ब्राझीलमधील अँमेझॉनच्या जंगलात सापडतात. म्हणतात की, त्या मुंग्या एवढा खतरनाक डंख मारतात की असे वाटते की बंदुकीची गोळीच शरीरात घुसली आहे.

मुंग्या सर्वाधिक काळ जगणाऱ्या प्राण्यांच्या श्रेणीमध्ये येतात. जगामध्ये असे अनेक किडे आहेत जे केवळ काही तास, काही दिवस जगतात. तर याच्या उलट ‘पोगोनॉमीमेक्स ऑही’  नावाची प्रजाती असलेली राणी मुंगी 30 वर्ष जिंवत राहते.

मुंग्या आपल्या आकारानुसार जगातील सर्वात मजबूत प्राणी आहेत. मुंग्या दिसताना जरी लहान दिसत असल्या तरी यांच्यामध्ये एवढी ताकद असते की, त्या आपल्या वजनाच्या 50 पट अधिक वजन उचलू शकतात.

मुंगीच्या शरीरात फुफुस नसतात. ऑक्सिजन आणि कार्बन डायोक्साईड घेणे-सोडण्यासाठी त्यांच्या शरीराला छोटे-छोटे छिद्र असतात. त्या जमीनीच्या कंपनाद्वारेच गोंधळाचा अनुभव घेतात.

तसे बघितले तर मुंग्यांना डोळे असतात, मात्र ते केवळ दाखवण्यासाठी असतात. त्याद्वारे त्या बघू शकत नाही. जेवण शोधण्यासाठी ज्यावेळी त्या बाहेर पडतात, तेव्हा राणी मुंगी रस्त्यात फेरोनोम्स नावाचे रसायन सोडते. त्याचा गंध घेत बाकी मुंग्या मागेमागे चालतात. त्यामुळे एक रांग तयार होते. हेच कारण आहे, ज्यामुळे मुंग्या एकामागोमाग रांगेत चालत असतात.

Leave a Comment